Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरकांद्याने मारले, केळीने तारले ! शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न

कांद्याने मारले, केळीने तारले ! शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न

Ahmednagar News : केळी खावीत तर जळगावचीच, असे नेहमीच म्हटले जाते. परंतु, कांदानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगावातही केळीचा तोरा पाहायला मिळत आहे.

लासलगावजवळील पाचोरे खुर्द (ता. निफाड) येथील शेतकऱ्याने पाच एकर क्षेत्रात केळी रोपांची लागवड केली.

त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जोपासना केल्याने आजमितीस या केळींची अरब देशांत निर्यात होत असून, या शेतकऱ्यास त्यातून लाखो रुपयांचा फायदा होणार आहे.

कांदा धोरणाबाबत सरकार वारंवार हस्तक्षेप करत असल्याने कांद्याच्या दरात चढउतार होऊन, कांद्याची शेती तोट्यात करण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आली.

त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे ? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या पाहता, शेतीत वेगळा प्रयोग करावा, असा सकारात्मक विचार पाचोरे खुर्दचे शेतकरी तानाजी आंधळे यांनी केला.

त्यांनी जळगाव येथून टिश्यू पेपर व केळीची रोपे आणून २६ डिसेंबर २०२२ रोजी त्यांची लागवड केली. केळीचे उत्पादन येण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागत असल्याने त्यांनी यादरम्यान कांद्याचे अंतर्गत पीकही घेतले होते.

परंतु, त्या कांद्याला प्रतिक्विटल केवळ ५०० ते ६०० रुपये दर मिळाल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही.

मात्र, त्याचे दुःख न करता आंधळे यांनी केळी पिकावर लक्ष केंद्रित केले. केळीची हार्वेस्टिंग केली आणि पहिल्या खुड्यात २६ टन केळी निघाली.

ही केळी त्यांनी निर्यात केली आहेत. सध्या दुसरा खुडा चालू असून, यात ५० ते ५५ टन, तर एकूण १५० ते १५५ टन केळीचे उत्पादन निघण्याची अपेक्षा असल्याचे आंधळे यांनी सांगितले.

अशी केली केळीची लागवड

जळगाव येथून टिश्यू पेपर व केळीची सहा हजार रोपे आणून पाच एकर शेतात आठ बाय चारवर बेड पद्धतीची लागवड केली. दीड फुटाचा बेड ठेवला. या केळी बागेला ठिबक सिंचनचा वापर करून द्रव खते दिली.

सात ते आठ महिन्यांत केळीने निसवण केली. यादरम्यान त्यांनी कांद्याचे अंतर्गत पीक घेतले होते. ११ महिन्यांनंतर केळीची हार्वेस्टिंग सुरू झाली असून, केळीच्या एका झाडावर सरासरी ३७ ते ३८ किलोचे घड निघत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments