Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरकोपरगाव झाले श्रीराममय : रॅलीत आमदार काळेंचा सहभाग

कोपरगाव झाले श्रीराममय : रॅलीत आमदार काळेंचा सहभाग

Ahmednagar News : प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली असून कोपरगाव शहरातदेखील आ. आशुतोष काळे यांनी

मागील आठवड्यापासून घेत असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण कोपरगाव शहर श्रीराममय झाले आहे.

श्रीराम भक्तांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असताना प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्व संध्येला कोपरगाव शहरात काढण्यात आलेल्या भव्य भगवा श्रीराम रॅलीत आ. काळे यांनी स्वतः दुचाकी चालवत सहभागी होऊन श्रीराम भक्तांचा उत्साह वाढविला.

अयोध्येत होत असलेल्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असल्यामुळे संपूर्ण देशभर धार्मिक वातावरण पसरले असून त्यानिमित्ताने कोपरगाव शहरात देखील अनेक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असून श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा समिती, समस्त कोपरगाव व सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य भगवा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीराम भक्तांचे मागील पाच शतकापासूनचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असतांना या अभूतपूर्व सोहळ्याचा अनमोल क्षण साजरा करण्यासाठी श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने काढण्यात आलेल्या भगवा श्रीराम रॅलीत सहभागी होवून जय श्रीरामच्या घोषणा देवून संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

डोक्याला भगवे फेटा परिधान करून गळ्यात भगवे उपरणे घेतलेल्या श्रीराम भक्तांनी भगवे झेंडे फडकावत या मोटारसायकल रॅलीमध्ये श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

कोपरगाव शहरातील चौका-चौकात पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतषबाजीत या भगवा श्रीराम रॅलीचे स्वागत करण्यात आले.

आनंदोत्सव साजरा करतांना कोपरगाव शहरात करण्यात आलेली सजावट, विविध मंदिरात सुरु असलेले धार्मिक कार्यक्रम,

सर्वत्र भगवे वातावरण त्यामुळे कोपरगाव शहरात हा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव अत्यंत शिगेला पोहोचला असल्याचे यावेळी दिसून आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments