Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : नगरमध्ये कोयता गॅंग ! चौघे पकडले, दोघे फरार..कोयते, स्कॉर्पिओसह...

Ahmednagar News : नगरमध्ये कोयता गॅंग ! चौघे पकडले, दोघे फरार..कोयते, स्कॉर्पिओसह मोठा मुद्देमाल ताब्यात

मध्यरात्री तरूणाला मारहाण करून लुटणाऱ्या कोयताधारी गॅंगला कोतवाली पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. यातील चौघे ताब्यात घेतले असून दोघे फरार झाले आहेत. कोतवाली पोलिसांनी स्कॉर्पिओ व चार कोयते असा सात लाख दोन हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

किरण बापू जरे (वय २३ रा. काटवन खंडोबा), नितीन मारूती जायभाय (वय २२ रा. त्रिमुर्ती चौक, सारसनगर), सोमनाथ ब्रम्हदेव वायभासे (वय १९ रा. कानडेमळा, सारसनगर), स्वप्नील विठ्ठल वारे (वय १९ रा. भगवान बाबा चौक, सारसनगर) असे अटक आरोपींची नावे असून पवन दीपक पवार व आकाश दिवटे (दोघे रा. नालेगाव) फरार झाले आहेत.

शनिवारी (दि. ३) पहाटे शुभम संजय आरक (रा. आनंदऋषी हॉस्पिटलजवळ) यांना सक्कर चौक येथे स्कॉर्पिओ वाहनातील सहा जणांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोकड काढून घेतली होती. तशी तक्रार देण्यासाठी आरक हे कोतवाली पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी पहाटे तक्रार न देता दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ४) तक्रार देण्यासाठी येतो, असे पोलिसांना सांगितले होते.

पोलिसांच्या रात्र गस्त पथकाला माहिती मिळताच त्यांनी सक्कर चौकात धाव घेत किरण बापू जरे, नितीन मारूती जायभाय, सोमनाथ ब्रम्हदेव वायभासे, स्वप्नील विठ्ठल वारे यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून स्कॉर्पिओ व चार कोयते जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान तक्रारदार आरक व मारहाण करणारे यांच्यातील वाद आपसात समझोता करून मिटला असल्याने पोलीस अंमलदार वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments