Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरपत्नीसमोरच पतीवर कोयत्याने केले सपासप वार ...

पत्नीसमोरच पतीवर कोयत्याने केले सपासप वार …

Ahmednagar News : अज्ञात चार जणांनी घरात घुसून पत्नीला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासमोरच पतीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत खून केला.

ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे घडली. योगेश सुभाष शेळके (वय ३५) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी आरती योगेश शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आरती योगेश शेळके आणि तिचा पती योगेश सुभाष शेळके हे मागील पाच वर्षापासून कोथूळ येथे शेती करत कुटुंबासह राहत आहेत.

मंगळवारी (दि.३०) रोजी पहाटे २.३० वा.सुमारास अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा वाजविल्याने फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला.

दरवाजा समोर उभे असलेल्या चार इसमांनी घरात प्रवेश करत त्यातील एकाने यांच्या गळ्याला कोयता लावुन तु काही बोललीस तर तुला मारुन टाकीन, असा दम दिला.

तर उर्वरित तिघांनी फिर्यादीचा पती योगेश शेळके याच्याजवळ जाऊन काहीएक न बोलता कोयत्याने गळ्यावर वार करत गंभीर जखमी केले.

यावेळी योगेश शेळके याने प्रतिकार करत असताना त्याच्या हातावर तसेच पायावर वार करुन गंभीर जखमी केली. या घटनेत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने योगेश शेळके याचा जागीच मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments