अहमदनगर

कृषी सेवा केंद्र फोडून रक्कम चोरली

टाकळीकाझी (ता. नगर) येथील कृषी सेवा केंद्र फोडून चोरट्यांनी सात हजार रूपयांची रोकड चोरून नेली.

6 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन ते 7 एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत ज्ञानदेव शेंडाळे (वय 25 रा. मदडगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या मालकीचे टाकळीकाझी येथे त्रिमुर्ती कृषी सेवा केंद्र आहे. त्यांनी ते कृषी सेवा केंद्र 6 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता बंद केले होते. यानंतर चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकाटून रोख रक्कम चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button