अहमदनगर

एलसीबीचा ‘त्या’ भागातील कत्तलखान्यावर पुन्हा छापा

अहमदनगर- कोठला भागात कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वारंवार छापेमारी केली आहे. तरीही तेथे कत्तलखाना सुरू राहत आहे. एलसीबीने पुन्हा घासगल्ली परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा मारला.

 

तेथे गोमांस, सहा लहान-मोठी गोवंशीय जनावरे, लोखंडी सुरा असा 80 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. कत्तलखाना चालविणारा सोहेल रऊफ कुरेशी (वय 21 रा. सदर बाजार, भिंगार) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

सोहेल रऊफ कुरेशी हा घासगल्ली, कोठला भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार बबन मखरे, दत्ता हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, भिमराज खर्से, सचिन आडबल, आकाश काळे, विनोद मासाळकर यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याचे अंमलदार शकिल सय्यद यांना सोबत घेत शनिवारी दुपारी कोठला भागातील घासगल्लीत छापा मारला.

 

तेथे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाच हजार रूपयाचे 25 किलो गोमांस, 75 हजाराचे लहान-मोठी जनावरे असा 80 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सोहेल रऊफ कुरेशी यालाही ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button