अहमदनगर

मेंढ्याच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; आठ मेंढ्या ठार तर एक जखमी

जिल्ह्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला असल्याचे दिसून येत आहे. मानवीवस्तीकडे आगेकूच करणारा बिबट्या नरभक्षक होऊ लागला आहे.

नुकतेच अशाच एका बिबट्याने कोल्हार बुद्रुक येथे धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने कोल्हार येथील बनकर फाटा शिवारात पत्र्याच्या शेडमधील मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केला.

यात 8 मेंढ्या जागीच ठार तर 1 जखमी झाली. तसेच मेंढीचे एक छोटे पिल्लू बिबट्याने ओढून नेल्याची घटना घडली.दरम्यान या घटनेने पशुपालकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हार बुद्रुक येथील फिरदोस आलमभाई पठाण यांची बनकर फाटा (राजुरी रोड) येथे शेती आहे. तेथे त्यांनी मेंढीपालन व्यवसाय सुरू केला असून त्यांच्या मालकीच्या 31 मेंढ्या होत्या.

एके दिवशी बिबट्याने या शेडमध्ये उडी मारून आत प्रवेश केला व मेंढ्यांवर हल्ला केला. यात 8 मेंढ्या जागीच ठार झाल्या तर 1 जखमी झाली. याशिवाय एक पिल्लू बिबट्याने ओढून नेले.

यातील 4 मेंढ्या गाभण होत्या. साधारणतः 60 हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे पठाण यांनी सांगितले. दरम्यान याबाबत कोपरगाव विभागाच्या वनाधिकार्‍यांशी संपर्क करून याबद्दल माहिती देण्यात आलीआहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button