अहमदनगर

‘चल आपण तिकडे जाऊ’, असे म्हणत युवतीचा…

युवतीचा हात पकडून,‘चल आपण तिकडे जाऊ’, असे म्हणत विनयभंग केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशील संभाजी कांबळे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी अहमदनगर शहरात राहणार्‍या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.

काल रात्री नऊ वाजता बोल्हेगावातील महादेव मंदिराजवळ ही घटना घडली. नऊ वाजता फिर्यादी युवती बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर येथील महादेव मंदिराजवळून रस्त्याने पायी जात असताना सुशील कांबळे तेथे आला.

त्याने युवतीचा उजवा हात पकडून जवळ ओढले,‘चल आपण तिकडे जाऊ’, असे म्हणून तिच्याशी गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पीडित युवतीने तोफखाना पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सुशील कांबळे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक धिरज अभंग करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button