ताज्या बातम्या

LIC Plan : एलआयसीचा नवीन प्लॅन ! गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त फायदे; जाणून घ्या

तुम्ही एलआयसीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला बचत आणि विमा पर्यायांचा दुहेरी लाभ मिळतो.

LIC Plan : देशात सर्वात जास्त लोक एलआयसीमध्ये गुंतवणूक करत असतात. ही अशी योजना आहे जी तुमच्या गुंतवणुकीला चांगला रिटर्न देत असते. तसेच एलआयसीवर लोक अधिक विश्वास ठेवतात.

दरम्यान आज आम्ही तुम्हाला LIC New Endowment Plus ही एक युनिट-लिंक्ड, नियमित प्रीमियम आणि नॉन-पार्टिसिपेटेड विमा योजना आहे ज्याबद्दल सांगणार आहे.

ही पॉलिसीधारकाला बचत आणि विमा पर्यायांचे दुहेरी फायदे देते. ही योजना पॉलिसीधारकाला सिक्योरिटी आणि लॉन्ग टर्म सेविंग्सयांचे उत्तम कॉम्बीनेशन प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती.

जुनी योजना बंद केली

या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला बाँड, सिक्युरिटी, बॅलन्स्ड आणि ग्रोथ फंड अशा चार गुंतवणूक फंडांमधून निवडण्याचा पर्याय आहे. जुनी एंडॉवमेंट प्लस योजना (टेबल क्र. 835), जी 2015 मध्ये सुरू झाली. LIC ने 1 फेब्रुवारी 2020 रोजी ते बंद केले आणि एक नवीन एंडोमेंट प्लस योजना (टेबल क्र. 935) सादर करण्यात आली आहे.

एलआयसी न्यू एंडोमेंट प्लस प्लॅन: प्रीमियम भरण्याचा कालावधी

पॉलिसीधारक केवळ पॉलिसीच्या मॅच्युरिटी कालावधीपर्यंत ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक अंतराने नियमितपणे प्रीमियम भरू शकतो.

वार्षिक, सहामाही किंवा त्रैमासिक प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जाईल, तर, देय तारीख चुकल्यास मासिक प्रीमियमसाठी 15 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जाईल.

या योजनेसाठी पात्रता, वयोमर्यादा जाणून घ्या

LIC ची नवीन एंडोमेंट प्लस योजना खरेदी करण्याचे किमान वय 90 दिवस आहे. तर, कमाल वय 50 वर्षे आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 60 वर्षे आहे.

मृत्यू लाभ

पॉलिसीधारकाचा जोखीम सुरू होण्याच्या तारखेपूर्वी मृत्यू झाल्यास, एकूण निधी मूल्य नामनिर्देशित व्यक्तीला दिले जाते. तर, जोखीम सुरू झाल्याच्या तारखेनंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, खालीलपैकी जास्त रक्कम दिली जाते:
एकूण भरलेल्या प्रीमियमच्या 105%, वार्षिक प्रीमियमच्या 10 पट, निव्वळ निधी मूल्य याप्रकारे रक्कम दिली जाते.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button