Saturday, February 24, 2024
Homeब्रेकिंगअहमदनगर ब्रेकिंग : युवकाची हत्या करणाऱ्या चौघांची जन्मठेप कायम !

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची हत्या करणाऱ्या चौघांची जन्मठेप कायम !

Ahmednagar Breaking : येथील दत्तात्रय बाळासाहेब मोरे या युवकाची हत्या केल्याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी ठोठावली होती. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे.

दत्तात्रय मोरे आणि बन्सी किसन लगड यांच्यामध्ये काही कारणांमुळे वाद निर्माण झाले होते. मोरे यांच्या घरी १२ मार्च २०१५ रोजी धार्मिक कार्यक्रम होता. ते गावातील महिलांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते.

निमंत्रण देऊन सायंकाळी सात वाजता घरी आले. त्यावेळेस पूर्ववैमनस्यातून आरोपी सतीश बन्सी लगड (वय २०), बन्सी किसन लगड (वय ५०), किसन गणपत लगड (वय ७२), आशाबाई बन्सी लगड (बय ४५, सर्व रा. वाघजई मळा, आठवड, ता. नगर) यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

या मारहाणीमुळे दत्तात्रय मोरे यांचा मृत्यू झाला. बाळासाहेब मोरे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द खून करणे, मारहाण केल्याचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि तात्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तुषार आढाव यांनी या गुन्ह्याचा तपास केला. येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात १८ साक्षीदार तपासण्यात आले.

अॅड. पुष्पा कापसे गायके यांनी सरकारतर्फे काम पाहिले होते. या खटल्यात चौघांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या निकालाविरोधात आरोपींनी खंडपीठात अपिल दाखल केले. खंडपीठाने चौघांची शिक्षा कायम ठेवली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments