अहमदनगर

जे बोललं ते करून दाखवलं… त्या कार्यकर्त्याने शहरातील अवैध धंदे दाखविले फेसबुकद्वारे लाईव्ह

नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी नगरमध्ये सुरु असलेले अवैध धंदे फेसबुक द्वारे लाईव्ह करत त्यांची पोलखोल केली आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान भांबरकार यांनी काही दिवसांपूर्वी नगर शहरातील अवैध धंदे बंद करा अथवा या सर्व अवैध धंदे मी फेसबुक लाईव्ह द्वारे सर्व नगरकरांना दाखवले जातील असं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल होतं.

पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही नगर शहरातील अवैद्य धंदे सुरूच असल्याचे आढळून आले. तसेच हे धंदे खुलेआमपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे.

यामुळे नगर शहरातील कायनेटिक चौक या परिसरातील एका भल्यामोठ्या क्लब मध्ये जाऊन संदीप भांबरकर यांनी फेसबूक लाईव्ह दारे थेट प्रक्षेपण करून पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

या ठिकाणी खुलेआमपणे जुगाराचा क्लब चालू असल्याचे दिसून येत आहे. हा क्लब कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि पोलिसांना सांगूनही तो बंद का झालं नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

तसेच यापुढे नगर शहरातील अवैध धंदे बंद केले नाही तर असेच फेसबुक लाईव्ह संपूर्ण नगरकरांना आणि पोलिसांनाही दाखवण्यात येतील असे आव्हान भांबरकर यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button