लेटेस्ट

iPhone SE 2022 वर मिळतेय भरघोस सूट… जाणून घ्या ऑफर

Apple iPhone SE 2022 भारतात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. iPhone SE 2022 ने मागील मॉडेलचे डिझाइन कायम ठेवले आहे. अॅपलचे हे डिव्हाईसची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. हे डिव्हाईस ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही खरेदी करू शकता. यावर ऑफर देखील सुरु आहे.

जाणून घ्या किंमत
६४ GB स्टोरेजसह Apple iPhone SE 2022 बेस मॉडेलची भारतात किंमत ४३,९०० रुपये आहे. १२८ GB मॉडेल आणि २५६ GB मॉडेलसाठी त्याची किंमत अनुक्रमे ४८,९०० आणि ५८,९०० रुपये आहे.

जाणून घ्या ऑफर
तुम्ही आयसीआयसीआय बँक, कोटक बँक किंवा एसबीआय कार्डवरून iPhone SE 2022 खरेदी केल्यास किंवा ऑर्डर केल्यास तुम्हाला २,००० रुपयांची झटपट सूट मिळेल. तुम्ही ते विनाखर्च EMI ऑप्शन आणि एक्सचेंज इन्सेंटिव्हसह देखील खरेदी करू शकता.

स्‍पेसिफिकेशन
iPhone SE 2022 मध्ये ४.७ इंचाचा HD रेटिना डिस्प्ले आणि तळाशी टच आयडी सेन्सर आहे. यात ४ GB RAM आणि ६४ GB, १२८ GB किंवा २५६ GB चे स्टोरेज ऑप्शन्स आहेत. हे A15 Bionic CPU वर चालते. iPhone SE 2022 आउट ऑफ द बॉक्स iOS १५.४ सह येतो. फेसटाइमसाठी एकच १२ मेगापिक्सेल बॅक कॅमेरा आणि ७ मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button