आर्थिक

LPG Cylinder Price : आनंदाची बातमी ! LPG गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा कमी ! जाणून घ्या आजपासूनचे नवीन दर

घरगुती गॅस सिलिंडरवर दिलासा दिल्यानंतर आता सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

Advertisement

LPG Cylinder Price : देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना आता मात्र लोकांना दिलासा मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे.

कारण आता घरगुती गॅस सिलिंडरवर दिलासा दिल्यानंतर आता सणासुदीच्या काळात सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात देखील कपात करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही आता कमी दरात गॅस सिलिंडर खरेदी करू शकता.

आता 19 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. वृत्तानुसार, आजपासून 19 किलोचे व्यावसायिक सिलिंडर 157 रुपयांनी कमी दराने तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

नवीन दरानुसार, राष्ट्रीय राजधानीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1522.50 रुपयांवर गेली आहे. पूर्वी दिल्लीत याची किंमत 1680 होती.

किमती कमी झाल्यानंतर महानगरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर उपलब्ध होणार आहेत.

नवीन दरानंतर, व्यावसायिक सिलिंडर आता कोलकातामध्ये 1636 रुपयांना (पूर्वी रुपये 1802.50) उपलब्ध होईल. म्हणजेच कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरवर 166.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत त्याची किंमत आता 1482 रुपयांपर्यंत खाली आली आहे, जी पूर्वी 1640.50 रुपये होती. मुंबईत 158.5 कपात झाली आहे.

Advertisement

त्याच वेळी, चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती दिल्लीतील समान प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. येथे आता व्यावसायिक सिलिंडर 1695 रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात त्याची किंमत 1852.50 रुपये होती.

दोन महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरवर 250 रुपयांहून अधिक कपात

गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी करण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्यातील कपात आणि आजच्या कमी झालेल्या किमतींनंतर, व्यावसायिक सिलिंडरवर एकूण 250 रुपयांपेक्षा जास्त कपात झाली आहे. दिल्लीत जुलैमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1780 रुपये होती, ती आता 1522.50 रुपये झाली आहे.

Advertisement

मंगळवारी घरगुती सिलिंडरचे दर कमी झाले

याआधी मंगळवारी (30 ऑगस्ट) घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी झाल्या होत्या. सरकारने केलेल्या कपातीनंतर दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत 903 रुपये झाली आहे. अशा प्रकारे आजपासून गॅस सिलिंडरचे दर राहतील.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button