LPG Price Change : LPG सिलेंडरचे नवीन दर जाहीर; सर्वसामान्यांना दिलासा की झटका? जाणून घ्या
देशाची राजधानी दिल्लीत घरगुती LPG सिलेंडरची किंमत 1103 रुपये आहे. त्याच वेळी, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1773 रुपयांवर कायम आहे.

LPG Price Change : देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. कारण देशातील सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर पाहता ते खरेदी करणे सर्वसामान्य लोकांसाठी अवघड होत चालले आहे. दरम्यान, देशातील महत्वाच्या वस्तूनाचे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात.
लोकांच्या कुटुंबाचे बजेट ढासळत असताना आज जुलैच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी LPG सिलिंडरच्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. अशा वेळी ग्राहकांना आता नवीन दराप्रमाणे LPG सिलेंडर खरेदी करावे लागणार आहेत.
मात्र इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये आहे.
त्याच वेळी, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1773 रुपयांवर कायम आहे. जून महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाली होती. मे महिन्यातही ते 172 रुपयांनी स्वस्त झाले होते.
देशांतर्गत एलपीजीच्या किमती कधी वाढल्या
शेवटच्या वेळी 6 जुलै 2022 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. आजपर्यंत देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1053 रुपये होती, जी आता 1103 रुपये झाली आहे. यामध्ये 50 रुपयांची वाढ दिसून येते. याचा अर्थ घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती एका वर्षापासून स्थिर आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमती
अशा सिलिंडरच्या किमती सतत चढ-उतार होत होत्या. दिल्लीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1769 रुपये राहिली. मार्च 2023 मध्ये, त्याची किंमत वाढली आणि रु. 2119.50 वर पोहोचली.
एप्रिल आणि मे मध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती अनुक्रमे 2028 रुपये आणि 1856.50 रुपये होत्या. घरगुती सिलिंडर 14.2 किलोचे आहेत, तर व्यावसायिक सिलिंडर 19 किलोचे आहेत.
दर कुठे तपासायचा?
तुम्हाला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील बदल स्वतः तपासायचा असल्यास, https://iocl.com/prices-of-petroleum-products या लिंकला भेट द्या. इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही एलपीजीच्या किंमतीतील कोणताही बदल पाहू शकता.