LPG Rate Change : सर्वसामान्यांना झटका ! एलपीजी सिलिंडर दर पुन्हा वाढले; जाणून घ्या किती…
एलपीजी सिलिंडरच्या दरात गेल्या चार महिन्यांपासून तेल कंपन्यांकडून सातत्याने कपात करण्यात येत होती. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती.

LPG Rate Change : देशात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना आता पुन्हा सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. कारण एलपीजी सिलिंडर दर पुन्हा वाढले आहेत.
1 जून रोजीही व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाल्यानंतर सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र यावेळी तेल कंपन्यांनी 4 जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.
यावेळी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र यावेळी 1 जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 1103 रुपये आहे.
रिपोर्टनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,773 रुपयांऐवजी 1,780 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच, आता यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा 7 रुपये जास्त द्यावे लागतील.
मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आले. हे दिल्लीत जुन्या किमतीत फक्त रु.1103 मध्ये उपलब्ध असेल.
चार महिन्यांनी सात रुपये वाढ
गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला जात होता. मात्र आजपासून दरात किरकोळ वाढ झाली आहे. 1 मार्च 2023 रोजी सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होती.
त्यानंतर एप्रिलमध्ये ते 2028 रुपये, मे मध्ये 1856.50 रुपये आणि 1 जून रोजी 1773 रुपये झाले. आता चार महिन्यांनंतर सिलिंडरची किंमत सात रुपयांनी वाढली आहे.
या वर्षी किंमत किती वेळा बदलली?
1 जून 2023 रोजी तेल विपणन कंपन्यांनी LPG च्या किमतीत 83 रुपयांनी कपात केली होती. यानंतर दिल्लीत त्याची किंमत 1773 रुपयांवर गेली होती. मे महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 171.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.
यानंतर दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 1856.50 रुपयांचा झाला आहे. एप्रिलमध्येही एलपीजीच्या किमतीत 92 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्याच वेळी, मार्चमध्ये, व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत सुमारे 350 रुपयांनी वाढ करण्यात आली.
1 जूनपासून मेट्रो शहरांमध्ये गॅस सिलिंडरचे दर
दिल्ली – रु 1773
कोलकाता – रु. 1895.50
मुंबई – रु. 1733.50
चेन्नई -1945 रु