Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरजरांगे यांना पाठिंब्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी ' महाराष्ट्र बंद'

जरांगे यांना पाठिंब्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी ‘ महाराष्ट्र बंद’

Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारी रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे.

उद्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे, वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

त्याचाच भाग म्हणून नगर शहरासह संपूर्ण जिल्हा बंद पुकारण्यात येत असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments