ताज्या बातम्या

Maharashtra Havaman Andaj : बळीराजा संकटात ! राज्यात पाऊस कधी पडणार? जाणून घ्या हवामान खात्याचे म्हणणे…

सध्या राज्यात पावसाने दांडी मारली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशा वेळी पाऊस कधी पडणार आशेवर सर्वजण बसले आहेत.

Advertisement

Maharashtra Havaman Andaj : देशात पावसाचा हंगाम सुरु होऊन बराच काळ उलटला आहे. मात्र अजूनही देशातील बहुतांश भागात पाऊस पडत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

तसे पाहिले तर 1 जून ते 30 सप्टेंबर हा पावसाचा हंगाम असतो. हा हंगाम सुरू होऊन अडीच महिने पूर्ण झाले आहेत. परंतु, ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसत आहे.

तसेच ऑगस्टचे पहिले 15 दिवसही बऱ्यापैकी कोरडे गेले आहेत. त्यामुळे या महिन्यात पाऊस सरासरी गाठेल की नाही याबाबतच्या शंकाही उपस्थित होत आहेत. पाऊस सरासरी गाठू शकला नाही तर त्याचा थेट फटका बळीराजाला बसत आहे.

Advertisement

जिल्ह्यातून पाऊस गायब

कालच्या म्हणजेच बुधवारी पडलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातही सकाळी साडेआठपर्यंत अवघ्या एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. केवळ हलक्या सरींचा पाऊस पडलेला आहे.

शहरात नोंदविले गेलेले तापमान

Advertisement

सध्या राज्यात कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

तसेच नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचसोबत पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता आहे.

दरम्यान,राज्यात लवकरच पाऊस कमबॅक करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. तर हवामान खात्याने लवरकरच राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button