ताज्या बातम्या

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात पावसाचा कमबॅक ! ‘या’ तारखेपासून अनेक भागात होणार धो- धो पाऊस, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

राज्यात सध्या अनेक भागात धो- धो पाऊस बरसत आहे. अशा वेळी आता हवामान खात्याने नवीन अंदाज जरी केला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Advertisement

Maharashtra Havaman Andaj : सध्या देशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही बऱ्याच भागात हवा तेवढा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

याबाबत मॉन्सूनचे पुनरागमन कधी होणार याविषयी हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे. पुणे हवामान विभागाचे अनुराग काश्यापी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात १७ ऑगस्ट पासून पाऊस अंशत: सक्रिय होणार असून विदर्भ, मराठवाडा, कोकणात काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे.

जुलै महिन्याच्या ३१ तारखेला पावसाने विश्रांती घेतली ती अजूनही कायम आहे. मात्र, लवकरच पाऊस कमबॅक करणार आहे. कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १७ ऑगस्ट नंतर मॉन्सून सक्रिय होणार आहे.

Advertisement

हा मॉन्सून अंशत: सक्रिय राहणार आहे. हळूहळू R/F क्रियाकलाप वाढणार असून यामुळे विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात. मेघगर्जनेसह तीव्र ते अतितीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. १९ ते १९ ऑगस्ट पासून राज्यात वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.

तसेच महाराष्ट्राच्या काही भागांवर मेघगर्जनेचे ढग असून त्यात पुणे नाशिक आणि सातारा, मराठवाड्यातील काही भागांचा समावेश आहे. या भागात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते माफक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत राज्यात १८ ते २४ ऑगस्ट आणि २५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर आणि नांदेड याच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तर उर्वरित जिल्ह्यात सरासरी पाऊस झाला आहे. तर सातारा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

देशातील हवामानाची स्थिती

ईशान्य आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे परिवलन आहे. या व्यतिरिक्त, एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स देखील तयार होताना दिसत आहे, ज्यामुळे उत्तराखंडमध्ये हलका किंवा मध्यम ते बऱ्यापैकी व्यापक पाऊस/वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कुठे-कुठे हवामान इशारा आहे

Advertisement

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील बहुतांश भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि हिमाचलसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button