Maharashtra Havaman Andaj : राज्यात पाऊसाचे जोरदार आगमन ! पुढील दोन दिवस 6 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा; जाणून घ्या हवामानाची स्थिती
महाराष्ट्रात पाऊसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वेळी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Maharashtra Havaman Andaj : गेले अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस अखेर राज्यात दाखल झाला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. याबाबत हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय 29 आणि 30 जून रोजी पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD च्या ताज्या अहवालानुसार, आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. आयएमडीने दिल्ली-एनसीआरच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करताना म्हटले आहे की, आज मुसळधार पाऊस पडू शकतो.
आजच्या हवामान अहवालानुसार मध्य प्रदेशात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 5 दिवस कोकण, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. या राज्यांमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. तसेच थंड वारे वाहत आहेत. आयएमडीनुसार, पुढील पाच दिवस हा दिलासा कायम राहू शकतो असे सांगण्यात येत आहे.
IMD च्या अंदाजानुसार, या आठवड्यात उर्वरित दिल्ली-NCR वर हलका पाऊस पडू शकतो. तर गुरुवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
“या आठवड्याच्या उर्वरित भागात आकाश सामान्यतः ढगाळ असेल आणि हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे” असे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा
IMD ने बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी करून महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. गुरुवारी मुंबईत तुलनेने कमी पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.
हवामान खात्याने ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.