ताज्या बातम्या

Maharashtra Havaman Live : महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस ! ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार असून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी, शाळांनाही सुट्टी…

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज काही भागात शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही तासांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशा वेळी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर अनेक भागात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई, उपनगर आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यासोबतच कोकण आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात पावसाचा जोर अजून वाढणार आहे.

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची पट्टा तयार झाला असून तो वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईत आज दुपारपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालये बंद

या पार्श्‍वभूमीवर आज सर्व शासकीय व खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबई आणि कोकण भागातही आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे आज संपूर्ण विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी आज मुंबई महानगरपालिका आणि मुंबईतील सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

तसेच सर्व मुंबईकरांना विनंती आहे की, कृपया सतर्क रहावे. खूप गरज असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासनामार्फत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. यासोबतच आज रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

आठवडाभराच्या शांततेनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस नसल्याने वातावरण चांगलेच तापले होते. सकाळपासून कडक उन्हाचा चटका जाणवत असतानाच रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शाळांना सुटी जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून त्याचा परिणाम जिल्ह्याच्या जनजीवनावर दिसून येत आहे. रात्री 11 वाजताच्या शासकीय अहवालानुसार जिल्ह्यात जगबुडी नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत असून, शास्त्री, बाव नदी, काजळी नदी आणि कोदवली या चार नद्या वाहत आहेत. आजही हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button