Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात मुसळधार! पुढील ४ तासांत कोसळणार धो धो पाऊस, या भागांना अलर्ट जारी
महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून पुढील ४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच पुढचे पाच दिवस देखील मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच येत्या ४ तासांमध्ये राज्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जुलै महिन्यामध्ये पावसाने दडी मारली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी धास्तावला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी सुखावला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील काही तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने नागरिकांना हवामानाचा अंदाज घेऊन घराबहर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर रायगड मुंबई आणि उपनगरं, आजूबाजूच्या काही भागामध्ये तीव्र ढग झाले आहेत त्यामुळे पुढील तीन ते चार तासांमध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील काही भागांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गोव्यातही पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात १८ जुलै काही ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ जुलै पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात २० जुलै मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाकडून मराठवाड्यासह इतर काही मेघगर्जनेसह हलक्या ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर तो पुन्हा एकदा मुसळधार पावसामध्ये सक्रिय झाल्याचे दिसत आहे. यंदाचा मान्सून जवळपास दोन आठवडे उशिरा महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप कामे देखील रखडली आहेत.