Maharashtra Havaman Andaj : मुंबई, पुण्यासह अनेक भागात आज मुसळधार पाऊस, IMD ने पुढील 3-4 तासांत या ठिकाणांना दिला ऑरेंज अलर्ट…
राज्यात पाऊसाने दमदार एन्ट्री केली असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वेळी IMD ने पुढील 3-4 तासांत या ठिकाणांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Maharashtra Havaman Andaj : राज्यात पाऊसाने अनेक भागात दणक्यात आगमन केले आहे. अशा वेळी आज मुंबई मध्ये अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. तर गोरेगाव, विलेपार्ले, लोअर परळ, अंधेरीसह शहरातील अनेक भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याने (IMD) एका अलर्टमध्ये म्हटले आहे की, “मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.”
IMD ने म्हटले आहे की, “मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे, ज्यामुळे मुंबईवर पावसाची शक्यता वाढली आहे आणि मध्यंतरी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
IMD ने मंगळवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा साठी ऑरेंज अलर्ट तर पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गसाठी गुरुवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.
तर महाराष्ट्राच्या राजधानीत मंगळवारीही मुसळधार पाऊस सुरूच असून येथे एकूण 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात हळूहळू पावसाचा जोर वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने, नैऋत्य मान्सून मुंबई आणि दिल्लीकडे सरकल्याचे IMD ने म्हटले आहे. यंदा नैऋत्य मान्सूनचे शहरात 25 जून रोजी उशिरा आगमन झाले. तसेच, मागील वर्षांप्रमाणे, जेव्हा जूनच्या पहिल्या आठवड्यात सामान्यतः प्री-मॉन्सून पाऊस पडतो, तेव्हा या वेळी शहरात फारसा पाऊस पडला नाही.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्यानुसार, आज पूर्व राजस्थान, गोवा, गुजरात प्रदेश, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि केरळमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या विविध भागात आज अतिवृष्टी होऊ शकते.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, लडाख, मध्य प्रदेश, गुजरात प्रदेश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमध्ये पाऊस पडू शकतो. तर मध्य प्रदेशातील 8 जिल्ह्यांमध्ये 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.