Maharashtra Havaman Andaj : पुणे- मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! हवामान विभागाने ‘या’ शहरांना दिला अलर्ट
Maharashtra Havaman Andaj : राज्यात एकीकडे पावसाचा अंदाज आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशा वेळी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.

Maharashtra Havaman Andaj : देशात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अशा वेळी आज हवामान विभागाने राज्यात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडेल याबद्दल सांगितले आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचे लोक राहतात. मात्र आता मान्सून लांबणीवर पडल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. राज्यात आणि देशात रखडलेला मान्सूनचा प्रवास 23 जूनपासून पुन्हा सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवला आहे.
अशा वेळी मुंबई, कोकणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. तर वातावरणही ढगाळ असल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उन्हाच्या झळादेखील तापदायक ठरत आहेत. तर आज (ता. 16) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर आज नंदूरबार, जळगाव, धुळे या शहरांमध्येही पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील हवामानाची स्थिती
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहिल तर नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल.
पाऊस लांबणीवर आहे.
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी 18 ते 21 जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र गुरुवारी जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 16 ते 22 जूनच्या आठवड्यातही राज्यात पावसाची शक्यता ऋण श्रेणीमध्ये दिसत आहे.
तर 23 जूनपासून मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तसेच विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये हवामानात अचानक बदल
दिल्लीमध्ये भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये जवळपास आठवडाभर उष्णतेचा प्रकोप होता. शुक्रवारीही दुपारपर्यंत तापमान 39 अंशांवर होते. दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आहे.
गुजरात आणि राजस्थानमध्ये बिपरजॉयचा कहर
अरबी समुद्रातून उठलेल्या बिपरजॉय या चक्रीवादळाने गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनारी भागात (कच्छ, द्वारका इ.) धडक दिली. लँडफॉलनंतर, चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने सरकले आणि तेथे जोरदार पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ आता पाकिस्तानकडे वळत आहे. त्याचा परिणाम दिल्ली, उत्तर प्रदेश, उर्वरित राजस्थान आणि हरियाणामध्ये दिसून येईल, असा अंदाज आहे.