ताज्या बातम्या

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस! हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रात काही प्रमाणात मान्सूनचा वेग कमी झाला आहे. मात्र येत्या १५ जुलैपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

Maharashtra Havaman Andaj : देशात सर्वदूर मान्सून सक्रिय झाला आहे. यंदाचा मान्सून बिपरजॉय चक्रीवादळामुळे उशिरा दाखल झाला असला तरी तो देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार कोसळत आहे. तसेच आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हिमाचल आणि उत्तराखंड राज्यातील नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे तर काही भागामध्ये पाऊस थांबला आहे. महाराष्ट्रातील अनेक भाग सध्या पावसाविनाच आहे. त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

Advertisement

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांपासून महाराष्ट्रात फारसा पाऊस पडला नसल्याचे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील कोकणामध्ये यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात पाऊस कोसळलाच नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच खरीप हंगामाची कामे देखील रखडली आहेत.

Advertisement

हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भात ११ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याकडून विकेंडमध्ये कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. कोकण वगळता राज्यातील इतरत्र भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई ठाण्यामध्ये देखील पावसाचा जोर ओसरला असल्याचे दिसत आहे.

मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून १० ते १३ जुलैपर्यंत कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Advertisement

हवामान विभागाकडून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

हिमाचल, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ते गुजरातपर्यंत जोरदार पाऊस कोसळत आहे. १५ जुलैपर्यंत कोकणात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button