Maharashtra Havaman Andaj : राज्यात मुंबईसह सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु, हवामान विभागाने ‘या’ भागांना दिला अतिवृष्टीचा इशारा
राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईसह अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Havaman Andaj : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून हवा तेवढा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. मात्र आता याबाबत हवामान विभागाने नवीन अपडेट दिले आहे.
सध्या राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईसह अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. अशातच आता काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार येत्या 3-4 दिवसांत दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबईत 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत हा पाऊस सुरूच राहणार आहे असे आयएमडीचे प्रमुख सुनील कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
राज्यासाठी 5 दिवसांचा येलो अलर्ट
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र वगळता मुंबई, ठाणे, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये पाऊस कमी झाला आहे. अशात आता हवामान खात्याकडून राज्यासाठी 5 दिवसांचा येलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावासाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पाऊस सुरू आहे. तर तळकोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यात आजही तुफान पाऊस असेल.
दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील लोकांना अजूनही पावसापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. येथील सखल भागातील लोकांच्या घरात पाणी शिरल्याची परिस्थिती आहे.
राज्य आणि केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि मोठ्या संख्येने लोकांना सखल भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दिल्लीतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर नोएडामध्येही आज पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत.