Maharashtra Havaman Andaj : राज्यात पाऊसाचा जोर वाढणार ! पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात होणार अति मुसळधार; जाणून घ्या आजची स्थिती
भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्हा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट (डोंगराळ) भागात वेगळ्या ठिकाणी "मुसळधार ते अति मुसळधार" पावसाचा इशारा दिला आहे.

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पाऊसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत. तर काही ठिकाणी पाऊसामुळे लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्हा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट (डोंगराळ) भागात वेगळ्या ठिकाणी “मुसळधार ते अति मुसळधार” पावसाचा इशारा दिला आहे.
मान्सून महाराष्ट्रात सक्रिय आणि जोरदार होत असल्याने, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. असे आयएमडीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे
तसेच IMD ने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकाकी ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हिमाचल आणि राजस्थानमध्येही पाऊसाचा जोर वाढणार
IMD ने राजस्थान आणि हिमाचल प्रदेशसाठीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दोन्ही राज्यांमध्ये पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 23 ते 25 जुलै दरम्यान पूर्व राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच वेळी, पुढील 24 तासांत कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे गुजरातलाही फटका बसला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अमरेली जिल्ह्यासह जुनागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. IMD आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) ने गुजरातच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे.
देशभरात विविध भागात पावसाची शक्यता
IMD ने पुढील 5 दिवसांत मध्य भारतात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 25 जुलै रोजी ओडिशात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर 25 जुलैपर्यंत भारतातील ईशान्येकडील राज्ये, आसाम आणि मेघालयमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.