Maharashtra Havaman Andaj : देशभरात मुसळधार पाऊस पडतोय, मात्र राज्याची स्थिती काय? जाणून घ्या पाऊस शेतकऱ्यांना कधी हसवणार…
पावसाळा सुरु होऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र अजूनही राज्यात हवा तेवढा पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे.

Maharashtra Havaman Andaj : उन्हाळा जाऊन पावसाळा सुरु झाला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत.
तर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत मात्र त्यांनतर पाऊसाने दांडी मारली आहे, ज्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, राजगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज आहे.
तर हवामान खात्याकडून राज्यातील 24 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी सोमवारी व्यक्त केली.
या 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या वेळी वादळी वारेही वाहतील.
देशातील हवामानाची स्थिती
देशभरात मुसळधार पावसाने सर्वांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मैदानी भागातील रस्ते महासागर बनले आहेत.
अनेक राज्यांमध्ये परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी बस, ट्रक आणि कार बुडत आहेत तर काही ठिकाणी पत्त्याच्या गठ्ठाप्रमाणे घरे कोसळली आहेत. जूनमध्ये एन्ट्री घेणाऱ्या मान्सूनने आता जनजीवन धोक्यात आणले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीतही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील पॉश भागात लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. देशाच्या राजधानीत यमुनेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर पोहोचली आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासोबतच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. विभागानुसार, पुढील एक आठवडा दिल्लीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशातही गेल्या चार दिवसांपासून पावसाने कहर सुरू केला आहे. राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक गाड्या पावसात वाहून गेल्या आहेत.
सतलज नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने अनेकांना या परिसरातून स्थलांतरित करण्यात आले. राज्यात आठवडाभर अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हवामान खात्याने 11 जुलै रोजी पंजाब, हरियाणा, गुरुग्राममध्ये अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमध्येही पावसाने आपत्ती ओढवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी डोंगरांना तडे जात असून त्यामुळे सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
याशिवाय अनेक शहरे आणि गावांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पावसाचा इशारा जारी
आयएमडीमध्ये आज राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा-कोकण, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, सिक्कीम आणि गुजरातमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर आसाममध्ये आजही हलका पाऊस पडू शकतो, तर कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.