ताज्या बातम्या

Maharashtra Havaman Andaj : हवामान खात्याने दिले मुसळधार पावसाचे संकेत ! मात्र तरीही राज्यात पाऊस पडत नाही; कारण…

गेले अनेक दिवस झाले राज्यात पाऊस पडत नाही. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सर्वजण पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

Maharashtra Havaman Andaj : सध्या ऑगस्ट महिना संपत आला असून अजूनही राज्यात हवा तेवढा पाऊस पडला नाही. त्यामुळे आता शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे. तसेच हवामान खात्याने दिलेले अंदाजही चुकीचे वाटू लागले आहेत.

मात्र असे असताना आता मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पण तरीदेखील पाऊस जोर धरत नाही. त्यामुळे हातात आलेली पीके जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच हवामान खात्याचा अंदाज खरा होताना दिसत नाही.

हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर बीड जिह्यातही काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पावसाचा हवामान खात्याने विजांसह जोरदार अंदाज व्यक्त केला आहे. यासोबतच राज्याच्या इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी होतील, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. गुरुवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच आज कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. २२ ते २५ ऑगस्ट मध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर पुणे आणि परिसरात २१, २२ आणि २३ ला वातावरण ढगाळ राहणार आहे. या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान, आकाश समान्यता ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी बुलढाण्यात सर्वाधिक २७ मिमी, वर्ध्यात १२.४, वाशिममध्ये ४, चंद्रपुरात १.२ आणि अमरावतीत १.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मराठवाडय़ात हलक्या स्वरूपात पाऊस पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button