Maharashtra Havaman Andaj : राज्यासाठी पुढील 12 तास महत्वाचे, मुंबईसह ‘या’ भागांत होणार मुसळधार पाऊस
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असला तरी मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या 3-4 तासांसाठी महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसांपासून शांत असणारा पाऊस आता पुन्हा जोर धरणार आहे. सध्या देशातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहेत. मात्र काही भागात अजूनही हवा तेवढा पाऊस झालेला नाही.
अशात हवामान खात्याकडून आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश राहिल तर उत्तर आणि पूर्व विदर्भातील काही भाग पुढील 1 ते 2 तासांत चांगला पाऊस होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेत आपली कामं करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3-4 तासांत जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा…
पुढील 3-4 तासांत ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत रत्नागिरी, पालघर, रायगड आणि कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील घाट भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस होईल, अशीही माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच 13 जुलै रोजी पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग, नाशिक, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना आज 13 जुलै रोजी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शनिवार, 15 जुलैपर्यंत आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची तसेच सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. 16 व 17 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच 22 जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
IMD ने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत यमुनेच्या पाण्याच्या पातळीने खऱ्याचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याच वेळी, खाजगी कार्यालयांमध्ये घरून काम करण्यासाठी सूचना जारी करण्यात आली आहे.