Maharashtra Havaman Andaj : राज्यात पावसाचा जोर वाढणार ! हवामान खात्याने दिले सावधानतेचे संकेत; ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट जारी
राज्यात पाऊसाचा जोर वाढणार आहे. याबाबत हवामान विभागाने अलर्ट दिला असून पुन्हा पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे.

Maharashtra Havaman Andaj : गेले अनेक दिवस पावसाने दडी मारली आहे. मात्र आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. याबाबत हवामान विभागाने चेतावणी दिली असून सावध राहण्याचे संकेत दिले आहेत.
हवामान खात्यानुसार बुधवारीही दिवसभर ढगाळ वातावरण राहील. यासोबतच हलक्या पावसाचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 आणि 26 अंश असू शकते.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी हवामान जवळपास सामान्य राहील. मात्र, हवामान खात्याने 15 आणि 16 जुलैच्या संदर्भात यलो अलर्टही जारी केला आहे.
राज्यात पुढील आठवड्यात पाऊसात वाढ होईल, 19/20 जुलै पासून पुढे बंगालच्या उपसागरावर एक कमी दाब निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण राहणार असल्यामुळे 20ते 23 जुलै राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार ,नाशिक, छत्रपती संभाजी नगरच्या काही भागात मध्यम पाऊस होईल.
कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात 16 जुलैपर्यंत पावसाची तूट राहणार आहे. प्रतिकूल घडामोडींमुळे येत्या 8 ते 12 जुलै दरम्यान राज्यात मान्सून सक्रीय नसेल.
परिणामी येत्या काही दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट तसेच मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचा जोर कमी राहिला आहे. मात्र 12 ते 13 जुलैदरम्यान पुन्हा तीन ते चार दिवस महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढेल, असं हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलं होतं.
24/25 जुलै नंत्तर बंगालच्या उपसागरावर पुन्हा तीव्र कमी दाब निर्माण होणार असल्यामुळे राज्यात काही भागात काही पाऊस वाढेल. जुलै च्या शेवटी पुन्हा तीव्र कमी दाबाचा पट्टा (WML )निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात मध्य भागात तीव्र पाऊस होण्याची शक्यता आहे.
जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. या काळात पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान अभ्यासकांनी सांगितलं आहे.
शुक्रवार दि.14 जुलैपासून खान्देश, नाशिकपासून ते सांगली, सोलापुर पर्यंतच्या 10 जिल्ह्यात आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील 5 दिवस म्हणजे सोमवार दि.17 जुलैपर्यन्त मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
14/15 16/17 जुलै रोजी कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर पासून काही भागात कमी पाऊस होईल. मात्र 20 ते 25 जुलैला या भागात मुसळधार पाऊस होईल.
मध्य महाराष्ट्र पुणे, सातारा, कोल्हापूर ,सोलापूर,सांगली पुढील दोन दिवस पाऊस पडेल. तसेच 12 जुलै या भागात काही ठिकाणी पाऊस होईल. 14/15/16 जुलै पाऊस या भागात देखिल वाढणार आहे.
दरम्यान, पावसामुळे सलग पाच दिवस राजधानीची हवा स्वच्छ वाहत आहे. मंगळवारीही दिल्लीचा हवेचा दर्जा निर्देशांक केवळ 69 होता. एक दिवसापूर्वी सोमवारी येथील हवेचा दर्जा निर्देशांक 65 होता.
पुढील अनेक दिवस हवेच्या गुणवत्तेची पातळी अशीच राहील आणि दिल्लीतील नागरिकांना प्रदूषणापासून दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.