Maharashtra Havaman Andaj : राज्यात पावसाला सुरुवात ! अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा ‘या’ भागांना अलर्ट
राज्यात पावसाने सुरुवात केली ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

Maharashtra Havaman Andaj : गेले अनेक दिवस गायब झालेला पाऊस आता राज्यात पुन्हा हळूहळू आगमन करत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
राज्यात जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली होती. अनेक दिवस पाऊस न आल्याने शेतजमिनीला भेगा पडल्या. पिके करपण्याची भीती व्यक्त होत होती. अशातच दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.
भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक गावांमध्ये घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
मात्र सोमवारपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. यादरम्यान राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे. पावसाअभावी मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यालाही झोडपले आहे. पावसामुळे हवेत दव निर्माण झाले आहे. त्यामुळे वातावरण गारवा निर्माण झाला आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूरमध्ये सकाळपासून पाऊस पडत आहे.
हवामान खात्याने शनिवारी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता. शनिवारपासून मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. आज राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.