Maharashtra Havaman Andaj :आला रे आला…! वीजांच्या कडकडाटांसह राज्यात पावसाची पुन्हा एन्ट्री, पुढील 48 तासांत ‘या’ भागांना अलर्ट जारी…
जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर महाराष्ट्रात पुनरागमन केलं आहे. गुरुवार पासून मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे.

Maharashtra Havaman Andaj : सध्या पावसाळा सुरु होऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही राज्यात हवा तेवढा पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
मात्र आता जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्रात पुनरागमन केलं आहे. गुरुवार पासून मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे.
त्यानंतर आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील 48 तासांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळं आता वरुणराजा बरसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
यंदा राज्यात मान्सूनचे आगमन व्हायला उशिर झाला आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर मध्यपर्यंत पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. जुलैमध्ये मान्सून हंगामातील 60 ते 80 टक्के पाऊस पडतो.
मात्र यंदा तेवढा पाऊस पडलाच नाही. त्यामुळे शहरात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. अजून ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण सप्टेंबर महिना बाकी आहे. त्यामुळे ही सरासरी भरून निघेल अशी आशा हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं हवामान खात्याने दोन्ही विभागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच विदर्भातील काही भागांमध्ये गुरुवार पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळं खरीप हंगामातील पीकं संकटात सापडली होती.
परंतु आता पावसाचं पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे आणि कोकणातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचं आगमन होणार असल्याने अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे.
उद्यापासून म्हणजेच 19 ऑगस्टपासून पुढील दोन आठवडे राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.