Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट ! मुंबई, पुण्यासह ‘या’ भागात धो- धो पाऊस; शाळांनाही सुट्टी…
राज्यात पावसाने दमदार आगमन केले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Maharashtra Havaman Andaj : सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. तर काही ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे.
अशा वेळी भारतीय हवामान विभागाने आज अनेक भागांना अलर्ट जरी केला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या ठिकाणी मुसळधार पाऊसामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत. IMD नुसार, प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, काही वेगवेगळ्या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे.
देशभरातील हवामानाची स्थिती जाणून घेऊया
देशातील बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नोएडामध्ये पावसामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर उत्तराखंडच्या अनेक भागात हवामान खात्याचा रेड अलर्ट कायम आहे.
त्याच बरोबर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा पाहता आज २६ जुलै रोजी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान खात्यानुसार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
दिल्लीसह या राज्यांमध्ये पाऊस
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज आणि उद्या पूर्व मध्य भारताच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, आज आणि उद्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या हालचाली दिसतील. त्याच वेळी, 28 ते 30 जुलै दरम्यान पूर्व भारताच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
इतर राज्यांची हवामान स्थिती
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आज कोकण आणि गोवा, कर्नाटकमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, पूर्व राजस्थान, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. लक्षद्वीप, गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याचसोबत जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, अंतर्गत ओडिशा, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप आणि तामिळनाडूमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.