Maharashtra Havaman Andaj : काळजी घ्या ! राज्यभर पावसाचा हाहाकार सुरूच, पुढील 48 तासांत हवामान खात्याने दिले चिंता वाढवणारे संकेत…
राज्यात अनेक भागात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नदी- नाले गच्च भरले असून लोकांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

Maharashtra Havaman Andaj : राज्यात गेले अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस अखेर पडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा पाणी प्रश्न मिटत असून शेतकऱ्याच्या डोक्यावरील संकट कमी झाले आहे.
सध्या गेल्या दोन दिवसांंपासून राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार, तर 25 सप्टेंबरपर्यंत बहुतांश जिल्ह्यांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. 25 सप्टेंबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय राहणार असून अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
तसेच राज्यात गणेशोत्सवाचे दिवस सुरु असून या मुहूर्तावर जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर भागातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आहे.
तर येत्या 25 आणि 26 सप्टेंबरला मात्र राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर पुण्याबद्दल सांगायचं झालं तर पुण्यामध्ये पुढील दोन दिवस आकाश मुख्यत: ढगाळ राहणार आहे.
दिवसभरात हलका ते अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच घाट माथ्यावर सोमवार आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. अशी शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
परतीचा पाऊस
25 सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांत यलो अलर्ट
भारतीय हवामान खात्याने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, पुढील चार दिवस वरुणराजा राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस पडणार आहे. कारण झारखंडमध्ये तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. ते सध्या चक्रीय स्थितीमध्ये आहे.
तर सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा रेषा सक्रीय झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत राज्याच्या चौफेर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.