ताज्या बातम्या

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा ! रविवारपर्यंत ‘या’ भागांना हवामान खात्याने दिला अलर्ट

राज्यात पावसाळा सुरुवात झाली असून अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वेळी हवामान खात्याने अनेक भागांना अलर्ट दिला आहे.

Maharashtra Havaman Andaj : राज्यात पाऊसाचा जोर वाढत आहे. गेल्या अनेक दिवसापासून दडी मारून बसलेला पाऊस अखेर राज्यात बरसत आहे. अशा वेळी आता हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.

हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गुरुवारी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाण्यात ऑरेंज अलर्ट आहे. तर पालघर आणि रायगड जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईतील पाऊसाची स्थिती

येत्या 24तासांत शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दरम्यान जोरदार वारे 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात.

भाईंदर रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकीच्या बाहेर इमारतीचा काही भाग कोसळला, त्यात एक व्यक्ती गाडली गेली. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत त्याला वाचवण्यात यश मिळवले.

ठाण्यातील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यानचे रेल्वे ट्रॅक बुधवारी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सकाळी 11 वाजल्यापासून कल्याण ते खोपोली (रायगडमधील) उपनगरीय सेवेवर परिणाम झाला. कल्याण-कसारा मार्गावर गाड्या धावत नाहीत, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

तसेच मध्य रेल्वेने दिवा-पनवेल-कर्जत मार्गावर आणि दौंड-मनमाड मार्गावरील काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्या वळवल्या आहेत, तसेच मुंबई-पुणे दरम्यान काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.

दरम्यान, हवामान खात्याने शुक्रवारी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा यांचा समावेश आहे. रायगड, रत्नागिरी आणि पुणे येथे रविवारपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.

रायगड आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने गुरुवारी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या वतीने आदेश जारी करण्यात आले आहेत.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button