ताज्या बातम्या

Maharashtra Jobs : तरुणांनो तयारीला लागा ! महाराष्ट्र नगरपरिषदेत 1782 जागांसाठी होणार भरती; अर्जप्रक्रिया लगेच जाणून घ्या

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील जवळपास 1782 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Maharashtra Jobs : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील जवळपास 1782 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या जागा सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठीची सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 ही आहे.

या पदांसाठी भरती होणार आहे

Advertisement

स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक , कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक. वरील सर्व पदे गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) अंतर्गत आहेत.

पदसंख्या – 1782

शैक्षणिक पात्रता काय असेल?

Advertisement

स्थापत्य अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.
विद्युत अभियंता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.
संगणक अभियंता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.
पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता – मेकॅनिकल/ पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा + MS-CIT किंवा समतुल्य.
लेखापरीक्षक/ लेखापाल – B.Com + MS-CIT किंवा समतुल्य.

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
अग्निशमन अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी + अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण + MS-CIT किंवा समतुल्य.
स्वच्छता निरीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी + स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन स्वरूपात असणार आहे.

Advertisement

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 13 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट – http://www.mahadma.maharashtra.gov.in

वयोमर्यादा किती असेल?

Advertisement

खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS – 5 वर्षे सूट.

अर्ज फी किती असेल?

खुला प्रवर्ग – 1000 रुपये.

Advertisement

मागासवर्गीय/ अनाथ/ EWS – 900 रुपये.

सदर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. 

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button