Maharashtra Mansoon Alert : काळजी घ्या! पुढील 3-4 दिवस राज्यात धो- धो बरसणार; आयएमडीने अतिवृष्टीच्या इशाऱ्यासह दिला रेड अलर्ट
राज्यात सध्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. यापुढेही महाराष्ट्र्रात 3-4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Maharashtra Mansoon Alert : सध्या हळूहळू राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. आणि आता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत आहे. आज (6 जुलै) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील 3 ते 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट कायम आहे.
तसेच सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट कायम आहे. विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट कायम आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम आहे.
पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे शाखेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानुसार येत्या काही दिवसांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, नागपूर येथे पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तीन ते चार दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर हवामानाने जोरदार पावसाची माहिती दिली
गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात पाऊस थांबला होता. मात्र पुन्हा एकदा हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून उशिराने दाखल झाला आहे.
जूनचे तीन आठवडे कोरडेच राहिले. मात्र गेल्या आठवड्यापासून मान्सूनने वेग पकडला आणि फारच कमी कालावधीत देशभरात पसरला. त्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून शांत राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे.