Maharashtra Monsoon IMD Alert : मुंबईत धो धो पाऊस! येत्या २४ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार, हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्रामध्ये उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने आता जोर पकडला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या काही तासांमध्ये आणखी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra Monsoon IMD Alert : देशात सध्या सर्वत्र मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी सध्या अनेक राज्यांमध्ये तो धो धो कोसळताना दिसत आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली होती. मात्र महाराष्ट्रात २ आठवडे उशिरा दाखल झालेला मान्सून सध्या जोरदार कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे.
येत्या २४ तासांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच पुढील काही तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याकडून मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात मुंबई शहरात 31 मिमी, पूर्व उपनगरात 54 मिमी आणि पश्चिम उपनगरात 59 मिमी पाऊस झाला आहे. तसेच पुढील काही तासांमध्ये आणखी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तसेच मुंबई व्यतिरिक्त राज्यातील रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद
जम्मू काश्मीरमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील प्रशासनाकडून सतर्कता म्हणून येथील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मान्सूनच्या पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा
मान्सूनचा पाऊस देशामध्ये दाखल झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आता मान्सूनचा पाऊस पडायला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मान्सूनचा पाऊस राज्यामध्ये सक्रिय झाल्याने आता शेतकऱ्यांची खरीप पिकासाठी शेतीच्या मशागतीच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होईल. तसेच पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर पेरणी करण्याचा सल्ला हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.