Maharashtra Monsoon Update : आनंदवार्ता! पुढील 72 तासांत मान्सूनचा पाऊस महाराष्ट्र व्यापणार, पहा हवामान अंदाज
येत्या ७२ तासांमध्ये महाराष्ट्रभर मान्सूनचा पाऊस दाखल होणार असल्याची बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नागरिक मान्सूनची वाट पाहत आहेत. मात्र अजूनही महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला नाही. यंदाचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास उशीर झाल्याने शेती कामे देखील रखडली आहेत.
मात्र आता हवामान खात्याकडून मान्सूनबाबत एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. येत्या ७२ तासांत म्हणूनच पाऊस महाराष्ट्रभर पसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
यंदाच्या मान्सूनवर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. या चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग देखील मंदावला आहे.
मॉन्सूनवर बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव
यंदाचा मान्सून केरळमध्येच दाखल होण्यास विलंब झाल्याने मान्सूनच्या पुढील प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. दरवर्षी सर्वसामान्य तारखेला म्हणजेच १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला आहे.
केरळमध्ये यंदाचा मान्सून एक आठवडा उशिरा दाखल झाल्याने सर्वत्रच मान्सूनचा वेग मंदावला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास उशीर झाल्याने मान्सूनचा देशभरातील प्रवास देखील मंदावला आहे. मात्र आता ७२ तासांत मान्सूनचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
२३ जूनपासून महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला सुरुवात
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे. कोकणामध्ये मान्सून दाखल झाला होता मात्र चक्रीवादमुळे मान्सूनचा प्रवास विस्कळीत झाला. मात्र मान्सूनचा वेग मंदावला असला तरी महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मान्सूनचा पाऊस महाराष्ट्र व्यापणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्यास वातावरण अनुकूल आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या या भागात पावसाची शक्यता
येत्या ७२ तासांमध्ये मान्सून मुंबई, पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे. 23 जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर तो किती दिवसांत महाराष्ट्र व्यापणार हे देखील पाहणे महत्वाचे आहे.