Maharashtra Talathi Bharti 2022 : महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यातील तलाठी पदांसाठी होणार भरती

Maharashtra Talathi Bharti 2022 :- तलाठी भरती संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करुन शासनांस व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारसी करण्यासाठी नागपूर अन्वये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात तलाठी साझे व मंडळ कार्यालयांसाठी एकूण ३११० तलाठी आणि ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकूण ३६२८ पद भरतीला शासन मान्यता देण्यात आली आहे.
या समितीतीने अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात यावी व मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतिम निर्णयार्थ सादर करण्यात यावा असा निर्णय घेतला.
दरम्यान महसूल विभागाअंतर्गत राज्यात तलाठीच्या ३११० आणि मंडळ अधिकारीच्या एकूण ५१८ रिक्त जागा भरण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.शासनाची अधिकृत वेबसाइट http://www.maharashtra.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
पुणे महसूली विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तलाठीची एकूण ६०२ तर महसूल अधिकाऱ्याच्या एकूण १०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अमरावती महसूली विभागाअंतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांअंतर्गत तलाठीच्या एकूण १०६ तर महसूल अधिकारींच्या एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नागपूर महसूली विभागाअंतर्गत येणाऱ्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याअंतर्गत तलाठीच्या ४७८ तर महसूल अधिकारींच्या एकूण ८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
औरंगाबाद महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, परभरणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तलाठीच्या एकूण ६८५ तर महसूल अधिकारींच्या ११४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नाशिक महसूल विभागाअंतर्गत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर येथे तलाठीची ६८९ पदे तर महसूल मंडळाच्या ११५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
कोकण जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तलाठी पदांच्या एकूण ५५० तर महसूल मंडळाच्या एकूण ९१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.