Mahindra Bolero : महिंद्रा बोलेरोचा मोठा विक्रम! विकल्या सर्वाधिक 7 सीटर कार, मारुती एर्टिगा ते टोयोटा इनोव्हालाही टाकले मागे
महिंद्रा ही भारतीय बाजारातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी सतत ग्राहकांच्या मागणीचा विचार करून नवनवीन कार लाँच करत असते.

Mahindra Bolero : मार्केटमध्ये महिंद्राच्या सर्वच कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनी आपल्या सर्व कारमध्ये शानदार फीचर्स, जबरदस्त मायलेज देत असते. तसेच त्यांच्या किमतीही इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी असतात. त्यामुळे ती इतर कंपन्यांना कडवी टक्कर देत असते.
कंपनीने आपली बोलेरो ही काही दिवसांपूर्वी लाँच केली होती. याच कारने सर्वात मोठा विक्रम केला आहे. कंपनीने सर्वात जास्त 7 सीटर कार विकल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने मारुती एर्टिगा ते टोयोटा इनोव्हा या बड्या कंपन्यांना मागे टाकले आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
महिंद्रा बोलेरो किती जणांनी खरेदी केली?
जर जून 2023 च्या 7 सीटर कार विक्री अहवालावर नजर टाकायचे झाले तर, पहिला क्रमांक हा महिंद्रा बोलेरोचा होता, जी 8,686 ग्राहकांकडून खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे बोलेरोच्या विक्रीत वार्षिक 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही 7 सीटर एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत बोलेरो आणि बोलेरो निओ प्लस सारख्या मॉडेलमध्ये सादर केली आहे. किमतीचा विचार केला तर महिंद्र बोलेरोची एक्स-शोरूम किंमत 9.78 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच कंपनीच्या बोलेरो निओची एक्स-शोरूम किंमत 9.63 लाख रुपयांपासून सुरू होते.
महिंद्रा स्कॉर्पिओनेही केली चांगली कामगिरी
कंपनीची सर्वात लोकप्रिय मध्यम आकाराची एसयूव्ही स्कॉर्पिओ ही मागील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये भारतीय बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त विक्री करणारी 7 सीटर कार होती. ती 8648 ग्राहकांकडून खरेदी करण्यात आली होती.
स्कॉर्पिओच्या विक्रीमध्ये वार्षिक 109% वाढ झाली असून आता यानंतर मारुती सुझुकी एर्टिगाचा क्रमांक येतो, जी मागील महिन्यात 8422 ग्राहकांकडून खरेदी करण्यात आली होती.टोयोटा इनोव्हा यादीत चौथ्या क्रमांकावर घसरली आहे आणि जून 2023 मध्ये तिला 8,361 ग्राहक मिळाले आहेत. इनोव्हाच्या विक्रीमध्ये वर्ष-दर-वर्ष 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याशिवाय Kia Carens देखील टॉप 5 मध्ये असून तिला गेल्या महिन्यात 8,047 ग्राहक मिळाले.
जाणून घ्या 10 पैकी टॉप 5 मधील SUV
बेस्ट सेलिंग 7 सीटर कारच्या यादीत सहाव्या क्रमांकावर महिंद्रा XUV700 असून जी 5391 ग्राहकांकडून खरेदी करण्यात आली आहे. यानंतर, मागील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये टोयोटा फॉर्च्युनरच्या 3086 युनिट्स, मारुती सुझुकी XL6 च्या 2,856 युनिट्स तसेच रेनॉल्ट ट्रायबरच्या 2,257 युनिट्स आणि ह्युंदाई अल्काझारच्या 2,119 युनिट्सची विक्री झाली होती.