अहमदनगर

एलसीबीची मोठी कारवाई; दीड हजार किलो गोमांसासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून सव्वा दोन लाखांचे दीड हजार किलो गोमांस व 10 लाख रूपये किंमतीचा टेम्पो जप्त केला.

 

कोतवाली पोलीस ठाण्यात अब्दुल हक कुरेशी ऊर्फ काका व गुलाब बनीलाल शेख (वय 32 रा. खेड ता. कर्जत) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब शेख याला अटक केली आहे. पोलीस कर्मचारी संदीप घोडके यांनी फिर्याद दिली आहे.

 

झेंडीगेट, कुरेशी मोहल्ला येथे अब्दुल हक कुरेशी हा त्याचे घरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस टेम्पोमध्ये भरून विक्री करण्यासाठी घेवून जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. यानंतर पथकाने सायंकाळी नमूद ठिकाणी छापा टाकुन कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button