अहमदनगर

अन्न प्रशासनाची मोठी कारवाई; गोडावूनमध्ये साठविलेला गुटखा पकडला

अहमदनगर- जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील डावरे गल्लीमध्ये सोना अपार्टमेंटमध्ये अवैधरित्या गोडावूनमध्ये गुटखा आणि सुगंधी तंबाखू-मसाला साठवून ठेवला होता. यावर अन्न प्रशासनाने छापा टाकला आहे.

 

या गोडावूनमधून तीन लाख 93 हजार 18 रूपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू-मसाला जप्त केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ए. आर. दाभाडे, पी.आर. कुटे यांनी पंचासमक्ष गुरूवारी सकाळी 10 वाजता छापा टाकला.

 

पथकाने दुकानाची झडती घेतली असता हिरा पान मसाला, रोयाल, सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, राजू इलायची सुपारी, बाराती पानमसाला, माणिकचंद गुटखा तसेच सुगंधी तंबाखू असा सुमारे तीन लाख 93 हजार 18 रूपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त करण्यात आली.

 

दुकान चालक नवीद मलिक तांबोळी (वय 44, रा. डावरे गल्ली, अहमदनगर) हा अन्न प्रशासनाच्या पथकासमक्ष पळून गेला. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात नवीद तांबोळी याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button