अहमदनगर ब्रेकिंग : दारूसाठी बापाचा खून करणाऱ्याला अटक’
त्याने वडील दिलीप साहेबराव शेळके (वय ५५ रा. गोंधवणी) यांचा ३१ ऑगस्टला जबर मारहाण करून खून केला होता. घटनेनंतर तो पसार झाला होता.

Ahmadnagar breaking : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बापाचा खून करणाऱ्या आरोपी मुलाला शहर पोलिसांनी अटक केली. बबलू दिलीप शेळके (रा. गोंधवणी) असे या मुलाचे नाव असून,
त्याने वडील दिलीप साहेबराव शेळके (वय ५५ रा. गोंधवणी) यांचा ३१ ऑगस्टला जबर मारहाण करून खून केला होता. घटनेनंतर तो पसार झाला होता.
आरोपी बबलू याने वडिलांना मारहाण केल्यानंतर ते बेशुद्ध झाले होते. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शेळके यांच्या घरी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात औषध उपचाराकरिता हलवण्यात आले.
मात्र तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. आरोपी बबलू हा घरातच लपून बसलेला होता. पोलिसांना पाहताच त्याने धूम ठोकली. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची काबुली दिली आहे.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, दादाभाई मगरे, रघुनाथ खेडकर, रघुवीर कारखिले, राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, रमीजराजा अत्तार, मच्छिंद्र काकडे, संभाजी खरात, आदिनाथ आंधळे यांनी ही कारवाई केली.