Mansoon In India : पावसाळ्यात ‘या’ निसर्गरम्य ठिकाणांच्या पर्यटक पडतात प्रेमात, भरभरून आनंद घेण्यासाठी एकदा तरी अवश्य भेट द्या…
पावसाळा सुरु झाला आहे. अशा वेळी लोक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी बाहेर पडतात, व पावसाच्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतात.

Mansoon In India : अखेर उन्हाळा सरकून पावसाळा सुरु झाला आहे. मात्र अजूनही देशात सर्वात पाऊस पडला नाही. पण सध्या हवामान बदलले असून ढग दाटून आले आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात.
अशा वेळी जर तुम्हीही पावसाच्या दिवसात डोंगर, दऱ्या, धबधबे पाहण्यासाठी जाणार असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगणार आहे त्या ठिकाणी तुम्ही गेला तर नक्कीच तुमचा आनंद गगनाला मावणार नाही. ही ठिकाणे देशातील विविध भागात आहेत. तुम्ही ठिकाणाविषयी सविस्तर जाणून घ्या
1) लोणावळा आणि खंडाळा : सह्याद्री पर्वतावर स्थित लोणावळा आणि खंडाळा मुंबई आणि पुण्याजवळील फेमस हिल स्टेशन आहे. पुणे -मुंबई प्रवास करणारे लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणा भेट देत असतात. हे ठिकाण पावसाळ्यात हिरव्या झाडाझुडपांमुळे आणि धबधब्यांमुळे सुंदर दिसते. येथील नॅचरल ब्युटी आणि जागेचं सौंदर्य या ठिकाणाला अतिसुंदर बनवते.
2) शिलाँग, मेघालय : मेघालयची राजधानी शिलाँग इथे मान्सूनदरम्यान मूसळधार पाऊस पडतो. ज्यामुळे येथील हिरवी झाडेझुडुपे आणि पर्वतरांगा बघण्यासारख्या असतात. या ठिकाणीची हिरवी झाले व पाणी तुम्हाला भुरळ पाडते.
3) व्हॅली ऑफ फ्लॉवर, उत्तराखंड : व्हॅली ऑफ फ्लॉवर पावसाळ्यात फुलांच्या सौंदर्याने अगदीच मनमोहक दिसते. इथे भेट देण्यासाठी मान्सूनचा काळ सगळ्यात उत्तम आहे. पावसाळ्यात तुम्हाला इथे फुलांच्या रंगछटा बघायला मिळतात. अगदी सुंगर रंगीबेरंगी फुले तुम्हाला खूप आनंद देतात. त्यामुळे तुम्हाला फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
4) अलेप्पी, केरळ – बॅकवॉटरसाठी ओळखलं जाणारं अलेप्पी हाउसबोट क्रूज मान्सूनसाठी एक बेस्ट स्पॉट आहे. पावसाळ्यात इथे बॅकवॉटर संपूर्णपणे भरलेलं असतं. येथील संपूर्ण परिसर हिरवळीने भरलेला तुम्हाला दिसेल. सर्वत्र हिरवळ असल्याने या ठिकाणाहून पर्यटकांचा पाय ओढत नाही.
5) कूर्ग, कर्नाटक : कर्नाटकातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्ह्णून ओळखले जाणारे कूर्ग, ज्याला कोडागू म्हणूनही ओळखतात. पावसाळ्यात इथे धुक्याने माखलेले डोंगर, खळखळणाऱ्या नद्या आणि धबधबे मनमोहक दिसतात. ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे जर तुम्ही ट्रेकिंगचा विचार करत असाल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या.
6) उदयपुर, राजस्थान : या शहराला सिटी ऑफ लेक असेही म्हटले जाते. शानदार महाल, चमचम करणारं तलावांचं पाणी आणि हिरवळीने माखलेले बगिचे यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. जून जुलैमध्ये ही ठिकाणं ठंडावतात. पावसाळ्यात हे शहर फार रोमँटिक दिसतं. पावसाळ्यात या ठिकाणी थंडाई असते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. अशा प्रकारे जर तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जायचे असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणा भेट द्या.