बाजारभाव

बाजार भाव: गावरान व लाल कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहुरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात एकूण 6 हजार 695 कांदा गोण्याची आवक झाली. गावराण कांद्याची 5 हजार 350 गोणी आवक झाली असून एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 505 रुपये ते 2 हजार रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 105 रुपये ते 1 हजार 500 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 1 हजार 100 रुपये भावाने विकला गेला.

 

तसेच गोल्टी कांद्याला 800 रुपये ते 1 हजार 100 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 13 कांदा गोण्यांना 2 हजार 400 रुपये, 52 कांदा गोण्यांना 2 हजार 300 रुपये, 24 कांदा गोण्यांना 2 हजार 200 रुपये, तर 66 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये भाव मिळाला. त्याचप्रमाणे, लाल कांद्याची एकूण आवक 1,345 कांदा गोणी झाली असुन एक नंबरचा लाल कांदा 1 हजार 905 रुपये ते 2 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 900 रुपयेे तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1 हजार 300 रुपये भावाने विकला गेला.

 

तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 300 रुपये ते 1 हजार 800 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 27 कांदा गोण्यांना कांदा गोण्यांना 3 हजार रुपये, 07 कांदा गोण्यांना 2 हजार 800 रुपयेे तर 20 कांदा गोण्यांना 2 हजार 700 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button