बाजारभाव

बाजार भाव: कांदा, डाळिंबाला किती मिळतोय भाव

अहमदनगर – राहाता बाजार समितीत रविवारी डाळिंबाच्या 4189 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 रुपये ते 225 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 96 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 46 ते 95 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

 

कांद्याला 2500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 4081 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 2000 तर जास्तीत जास्त 2500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 1950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1200 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1100 ते 1300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button