बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयाबीनला किती मिळतोय भाव

अहमदनगर – राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात शनिवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात 15 हजार 805 कांदा गोण्याची आवक झाली.

 

एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 300 ते 1 हजार 600 रूपये, दोन नंबरचा कांदा 900 ते 1 हजार 295 रूपये तर तिन नंबरचा कांदा 100 ते 895 रूपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 500 ते 900 रूपये भाव मिळाला.

 

अपवादात्मक 46 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रूपये व 107 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रूपये भाव मिळाला. तसेच भुसार मालात गहू 2100 ते 2200 रूपये, हरभरा 3500 रूपये, सोयाबीन 4801 रूपये, मूग 6101 ते 7326 रूपये व भुईमूग शेंगा 3700 रूपये याप्रमाणे भाव मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button