बाजारभाव

बाजार भाव; कांदा दोन हजाराच्या पुढे; कुठे किती मिळतोय भाव

अहमदनगर- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी कांद्याच्या जास्तीत जास्त भावात सोमवारच्या तुलनेत साडेचारशे रुपयांनी वाढ झाली.

 

बुधवारी 2150 रुपयांपर्यंत भाव निघाला. कांद्याची एकूण 55 हजार 107 गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला 2000 ते 2150 रुपयांपर्यंत भाव मिंळाला.

 

मोठा कलरपत्ती कांद्याला 1700 ते 1800 रुपयांपर्यंत, मुक्कल भारी कांद्याला 1400 ते 1500 रुपये, गोल्टा 900 ते 1100 रुपये, गोल्टी 700 ते 900 रुपये, जोड कांद्याला 200 ते 500 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

 

 

तसेच श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये कांदा 1800 रुपये क्विंटल भाव निघाला आहे. बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एकूण 15785 गोणी तर 8706.17 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातील 1 नंबर कांदा कमीत कमी 1350 ते जास्तीत जास्त 1800 रुपये क्विटल, नंबर 2 कांदा 750 ते 1300 व नंबर 3 कांदा 300 ते 700 तसेच गोल्टी कांदा 900 ते 1350 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघालेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button