बाजारभाव

बाजार भाव: दोन मार्केटमध्ये आज कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याचे भाव जास्तीत जास्त 1700 रुपयांपर्यंत निघाले. आवकेत जवळपास 23 हजार गोण्यांनी वाढ झाली. बुधवारी 400 वाहनांतून 72 हजार 825 कांदा गोण्यांची (40 हजार क्विंटल) आवक झाली.

 

एक-दोन लॉटला 1600 ते 1700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1350 ते 1550 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1200 ते 1400 रुपये, गोल्टा कांद्याला 800 ते 1100 रुपये, गोल्टी 500 ते 900 रुपये, जोड कांद्याला 200 ते 450 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 100 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

 

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याला 1600 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या 23 हजार 31 कांदा गोण्यांची आवक झाली होती.

 

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव – एक नंबर कांदा- 1250 ते 1600, दोन नंबर कांदा- 850 ते 1250, तीन नंबर कांदा- 400 ते 850, चार नंबर कांदा- 100 ते 400.

 

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button